Saturday, September 8, 2007

संगणकावर मराठीत लिखाण

मराठीत लिखाण करण्याचे अनेक मार्ग आहेत. हे मुख्यत: ट्रांसलिटरेशन म्हणजे रोमन लिपीत लिहिलेल्या मराठीचे देवनागरीत रुपांतर करून केले जाते. ह्या दैनंदिनिवरिल लेखहे असेच लिहिले आहेत. (http://quillpad.in/marathi/) परंतु कीबोर्डवर थेट मराठी अक्षरे टाइप करण्यासाठी ज्या पध्दती अस्तिवात आहेत, त्या वापरल्या जात नाहीत. नुकतेच एका प्रौढ व्यक्तीस संगणक शिकवताना हे जाणवले, की इंग्लीश कीबोर्ड वापरण्याची सवय असलेल्या व्यक्तीस जरी ट्रांसलिटरेशन वर आधारित पध्दत मराठी टाइप करण्यास सुलभ असली तरी सर्वसामान्य जनतेसाठी ही पध्दत तितकिशी चांगली नाही. याशिवाय, ज्या भारतात जवळपास 25% लोकसंख्या देवनागरी लिपीचा वापर करते, वा त्यातील बहुसंख्य लोकांना इंग्लीश येत नाही, त्यांना हा मार्ग वापरण्यायोग्य नाही. म्हणून कीबोर्डवर थेट मराठी अक्षरे टाइप करण्याची पध्दत शिकंयाचा प्रयत्न येथे नोंदला जाइल

0 comments: